शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By नई दुनिया|

अ‍ॅडव्हॉन्स

NDND
आज पुन्हा माझ्यासमोर तो कामगार पगारी उचलेची मागणी करत होता. नेहमीप्रमाणे याहीवेळी मी त्याला कारण विचारले. आतापर्यंत बायको, मुले तर कधी स्वत:च्या आजारपण अशी त्याची कारणे होती. यावेळी मात्र, कारणे न देता तो मान खाली घालून नुस्ता उभा होता.

मी पुन्हा पुन्हा विचारल्यावर त्याने घाबरत उत्तर दिले.'साहेब, खोटं बोलणार नाही. उद्या 'डराय डे' (ड्राय डे) आहे. त्यामुळं दारूची दुकानं बंद राहतील.' साहेब, मी विचार केला की, उद्याची व्यवस्था आजच करून ठेवावी' त्याच्या उत्तराने माझा गळा ड्राय झाला होता. आता कुठलाही प्रश्न न विचारता, मी त्याला अ‍ॅडव्हॉन्स देऊन रवाना केले.