गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

फ्रूट कस्टर्ड

साहित्य: 3 चमचे व्हनिला कस्टर्ड पावडर, 3 पाव दूध, दीड वाटी साखर, 1 वाटी डाळींबाचे दाणे, 1 वाटी साफ केलेल्या संत्र्याच्या फोडी, 1 वाटी चिरलेली स्ट्रॉबेरी, 1/2 चिकुच्या फोडी, 1/2 वाटी सफरचंदाच्या फोडी,1 वाटी चिरलेले द्राक्षे, 1/2 वाटी काजुचे तुकडे. 
 
कृती: एक वाटी थंड दूध बाजूला काढून बाकीचे दूध गॅसवर उकळत ठेवावे. वाटीतील दुधात कस्टर्ड पावडर व साखर एकजीव करावे. त्यात गुठळ्या नसाव्यात. नंतर ह मिश्रण उकळी आलेल्या दुधात टाकून पुन्हा 2/3 मिनिटे उकळू द्यावे. गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यावे. मग फ्रीजमध्ये 3-4 तास चांगले थंड होऊ द्यावे. नंतर त्यात सर्व फळे व काजू टाकून ढवळून घ्यावे. थंडच सर्व्ह करावे. हा पदार्थ लहान मोठ्यांचा आवडता पदार्थ आहे.