testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चॉकलेट केक विथ पार्ले जी बिस्कीट

 cake
साहित्य : पार्ले जी बिस्कीटे - १० रु. चा पुडा, कोको पावडर - २ चमचे, दूध - ११/२ कप, साखर - १/२ वाटी, इनो (साधा) - ५ रु. चे पाकिट.

कृती :
प्रथम मिक्सरच्या साहाय्याने बिस्कीटांचा बारीक चुरा करून घ्यावा. त्या चुऱ्यामध्ये साखर आणि कोको पावडर घाला. नंतर दूध घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरबरीत भिजवा. ऍल्यूमिनियम च्या डब्याला सर्व बाजूने तूप लावून घ्या. गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवा. वरील मिश्रण इनो घालून फेटून घ्या. मिश्रण फेटल्यानंतर ते डब्यामध्ये ओता. झाकण लावून डबा तव्यावर ठेवा. साधारण ३० मिनिटाने झाकण उघडून केक तपासून पाहा. बीन अंड्याचा हा केक खुप छान लागतो.


यावर अधिक वाचा :