गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

केशरी मलई पेढा

साहित्य : 1 लीटर दूध, 2 मोठे चमचे साखर, 1/2 कप कंडेस्ड मिल्क, 1 लहान चमचा लिंबाचा रस, थोडेसे केशर. 

कृती : सर्वप्रथम एका भांड्यात दूध घट्ट होईपर्यंत आटवावे. नंतर त्यात लिंबाचा रस घालावा. जेव्हा दूध फाटायला लागेल तेव्हा साखर व कंडेंस्ड मिल्क घालावे. घट्ट होईपर्यंत आटवावे. गार झाल्यावर लहान लहान गोळे घेऊन त्याचे पेढे तयार करावे. केशराने सजवून घ्यावे.