गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

आंब्याचे धिरडे

साहित्य : 1 आंब्याचा रस, 2 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी साखर,  2 चमचे वेलची पूड,  2 मोठे चमचे बदाम, पिस्त्याचे काप, 1 मोठा चमचा खवलेले नारळ, लोणी. 

कृती : सर्वप्रथम रवा, मैदा चाळून त्यात साखर व आंब्याचा रस टाकून एकजीव करावे. त्यात वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप टाकावे. नॉनस्टिक तवा तापत ठेवून त्यावर लोणी टाकावे नंतर एक चमचा मिश्रण घालून धिरडे बनवावे. दोन्ही बाजूनं लोणी लावून चांगले शेकावे. सर्व्ह करताना धिरड्यावर खवलेले खोबरे टाकून दह्या सोबत द्यावे.