शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2015 (12:24 IST)

करंजी

साहित्य: एक वाटी रवा, एक वाटी मैदा, पाव किलो साखर, एक खोवलेले नारळ, दूध, तूप, वेलदोडे.
 
कृती: सर्वप्रथम रवा व मैद्यात तुपाचे मोहन घालून दुधात घट्ट भिजवून तासाभरासाठी झाकून ठेवा. खोवलेले खोबरे आणि साखर शिजवून सारण तयार करा. त्यात वेलचीची पूड घाला. भिजवलेल्या रवा-मैद्याला चांगले कुटून त्याच्या गोळ्या करा आणि पुरीप्रमाणे लाटून तयार केलेले सारण घालून करंज्या तयार करा. करंज्या मंद विस्तवावर तळा.