गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

कराची हलवा

साहित्य : 100 ग्रॅम मक्याचे पीठ, 100 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम साखर, काही थेंब गुलाबपाणी, 2 मोठे चमचे कापलेले बदाम, काजू, 1 लहान चमचा लिंबाचा रस. 

कृती : मक्याच्या पिठाला 3/4 कप पाण्यात भिजवावे. एक कप पाण्यात साखर मिसळून उकळावी. लिंबाचा रस मिसळावा आणि पुन्हा उकळावे. पाकातील मळ काढावा. कमी आंच करून थोडे मक्याच्या पिठाचे मिश्रण मिसळावे आणि हालवत राहावे. मक्याच्या पिठाचे मिश्रण पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी. मिश्रण घट्ट होवून चिकटणे सुरू करील तोपर्यंत शिजवावे. आंच अगदी कमी करावी. आता थोडे तूप टाकून चांगले मिसळावे. तूप आटल्यास आणखी थोडे तूप टाकावे आणि मिसळावे व तेसुद्धा आटू द्यावे. सर्व तूप ह्याप्रकारे मिसळावे. एक चमचा मिश्रण एका प्लेटवर ठेवा जर हे चिटकले नाहीतर आंचेवरून काढावे. गुलाबपाणी मिसळून तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढावे. कापलेले बदाम आणि काजू त्यावर लावावे. मनाप्रमाणे आकार देऊन कापावे.