गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

खोबर्‍याच्या साटोर्‍या

साहित्य : चार वाट्या क‍णीक, दोन वाट्या साखर, एक नारळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, आठ-दहा वेलदोडे, तळण्याकरिता तूप, पाव वाटी तेल.

कृती : साडेतीन वाट्या पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून व तेल घालून ते पाणी उकळावे. नंतर त्यात कणीक घालून चांगले ढवळावे व दोन वाफा येऊ द्याव्यात. साखर व नारळाचे खोवलेले खोबरे एकत्र करून सारण तयार करावे. शिजविलेल्या कणकेच्या लहान लहान गोळ्या करून त्यात वरील सारण भरून पुरणपोळीप्रमाणे पण जाड पोळ्या लाटाव्यात. साधारणपणे मोठ्या पुरीइता आकार असावा. नंतर मंद विस्तवावर तुपात तांबूस होईपर्यंत तळून काढाव्यात.