शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

फळांचे दह्यातील पुडींग

ND
साहित्य : संत्रं, केळी, सफरचंद, पेरू, अननस, आंबा, चिकू, डाळिंब, बीनं बियांची द्राक्षे, चवीप्रमाणे साखर, अर्धा किलो गोड ताजे दही, थोडी साय, वेलची पूड किंवा इसेन्स.
कृती : प्रथम सर्व फळांची साले काढावीत. ज्या फळात बिया असतील त्यातील बिया काढाव्यात. डाळिंबाचे दाणे काढावेत. सर्व फळे बारीक चिरावीत. एका स्टीलच्या पातेल्यात किंवा काचेच्या बाऊलमध्ये चिरलेल्या फळांच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, साखर, एकत्र मिसळावी. नंतर गोड ताजे दही रवीने चोपडे करावे. त्यात थोडी साय टाकून मिसळावी. फळांमध्ये हे गोड दही साय मिसळलेली एकत्र करून वेलची पूड किंवा आवडीचे इसेन्स अगदी थोडे टाकावे. लहान बाऊलमध्ये सर्व्ह करावे.