शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

बीटचा हलवा

साहित्य: बीट, साखर, खवा, वेलची पूड, मनुका, चारोळी, तूप.
कृती: कच्चे बीट साल काढून किसावेत. तूप गरम करून कीस परतून त्यात पाणी शिंपडून, साखर घालून मंद आचेवर वाफवून घ्या. मिश्रणाचा गोळा व्हाला लागला की नंतर कुस्करलेला खवा, वेलची पूड, मनुका, चारोळी घालून ढवळून घ्या. वाटल्यास तसाच सर्व्ह करा किंवा ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण पसरवून घ्या. आणि आवडीप्रमाणे आकारात कापा.