मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

संत्र्याची खीर

ND
साहित्य : 5 संत्री, 5 कप स्किम्ड मिल्क, 1/2 कप स्वीटनर पाउडर, 4-5 वेलदोडे.
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात दूध घेऊन घट्ट होईपर्यंत उकळावे. दूध उकळ्यानंतर त्यात वेलची पूड स्वीटनर टाकून थंड करायला ठेवावे. नंतर संत्र्याच्या फोडींचे बिया काढून त्याचे तुकडे करून ठेवावे. थोड्या फोडी वेगळ्या काढून बाकी सर्व दुधात घालाव्यात. मिश्रणाला एका बाऊलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर सर्व्ह करताना त्यात बाकी उरलेल्या संत्र्याच्या फोडी टाकाव्या.