शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

स्वत:च्या घरात प्रेवश करायचा, मग हे करा!

प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपलं स्वत:चं घर असाव, अशी इच्छा नेहमीच असते. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही भाड्‍यांच्या घरातून आपल्या स्वत:च्या घरात पाऊल टाकू शकता.  
 
पाहुयात काय आहेत हे उपाय... 
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील जड वस्तू किंवा अनावश्यक सामान घरातील दक्षिण-पश्चिम भागामध्ये ठेवावे. इतर ठिकाणी जड सामान किंवा वस्तू ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. 
- घरातील उत्तर-पूर्व भाग नेहमी रिकामा ठेवावा. या ठिकाणी सामान ठेऊन घरात अडगळ निर्माण करू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी नेहमी सतावत राहतील.
- जुन्या घरात वास्तूदोष आहे का? हे तपासून घ्या. भाड्याच्या घरातील वास्तूदोष तुम्ही सुधारू शकणार नाही मात्र नवीन भाड्याचं घर नक्कीच शोधू शकता.
- बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील पाण्याचा नळ उत्तर-पूर्व दिशेकडून घ्या. त्याचबरोबर बाथरूम, स्वयंपाकघर, इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकनार नाही याची काळजी घ्यावी.
- बेडरूममध्ये पलंगाचे डोके दक्षिण दिशेकडे असावे.
- झोपताना तुमचे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तर दिशेला असावेत. हे शक्य नसेल तर पश्चिम दिशेला डोके करून झोपावे. अशाप्रकारे झोपल्यास विविध आजारांपासून बचाव होईल.
- जेवताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. हा उपाय केल्यास जेवणाची पूर्ण शक्ती प्राप्त होते आणि वास्तुदोष नष्ट होतो.