शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

या वर्षी अमलात आणा या 22 वास्तू टिपा

वर्ष 2017 मध्ये या 22 वास्तू टिप्स अमलात आणून आपण घरात आणि जीवनात सुख- समृद्धी आणू शकता.
* लिव्हिंग रूमच्या प्रमुख भीतींवर आपल्या कुटुंबाची फोटो लावा. याने कुटुंबातील लोकांचे आपसात प्रेम वाढेल.

* घरात टेलिफोन दक्षिण-पूर्वी किंवा उत्तर- पश्चिम दिशेत ठेवा. फोन कधीही दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर- पूर्व या दिशेत ठेवू नये.

* मुख्य खोलीतील उत्तर-पूर्वी भागात एक एक्वेरियम ठेवा, ज्यात नऊ सोनेरी मासोळ्या आणि एक काळी मासोळी ठेवावी. याने घरात समृद्धी आणि आनंद नांदेल.

* देवाकडे प्रार्थना करताना आपला चेहरा उत्तर पूर्वी कडे असावा. डोळे बंद करून सच्च्या मनाने देवाची प्रार्थना करावी.

* डायनिंग एरिया किंवा डायनिंग टेबल कधीही मुख्य दरासमोर नसावं.

* लिव्हिंग रूममध्ये उदय होत असलेल्या सूर्याचा फोटो लावावा. हे भाग्योदय, नवीन संधी, यश मिळण्याचे सूचक आहे.
 
* घरातील उत्तर-पूर्वी क्षेत्रात एक तरी तुळशीचे रोप असावे. याची उंची 1.5 मीटरपेक्षा अधिक नसावी.
 
* घरात एखाद्या बॉक्स किंवा पर्समध्ये पैसे वाचवून ठेवतं असाल तर ही पर्स खोलीतील दक्षिण दिशेत ठेवा. आणि अलमारी अशी ठेवा ज्याचं दार उत्तर दिशेकडे उघडत असेल.
* टॉयलेट आणि बाथरूमचे दारं बंद ठेवावे. हे दार उघडले असल्यास नकारात्मक ऊर्जा आणि बॅ‍क्टेरिया घरात प्रवेश करू शकतात.
 
* कुंचा, झाडू, पोछा किंवा स्वच्छतेसाठी वापरली जाणारी कोणतीही वस्तू स्वयंपाकघरात ठेवू नये. स्वयंपाकघरात आरसा ठेवणेही योग्य नाही.
 
* घरातील सर्व काणे-कोपरे स्वच्छ ठेवावे आणि प्रत्येक ठिकाणी उजेड असल्याची व्यवस्था बघावी. नैसर्गिक उजेड येत नसल्यास तिथे लँप किंवा डेकोरेटिव्ह लाइट्स लावावी.

* बेडरूममध्ये झाड किंवा पाण्याची संबंधित डेकोरेटिव्ह वस्तू ठेवू नये.
 
* बेडरूममध्ये टीव्ही किंवा कॉम्प्युटर ठेवू नये. हे नेहमी लिव्हिंग रूम किंवा स्टडी रूमच्या दक्षिण- पूर्वी क्षेत्रात ठेवायला पाहिजे.
 
* घरातील मुख्य दारावर नेहमी अधिक प्रकाश देणारा लाइट लावावा.
* घराच्या भीतीवर कधीही उदास किंवा नकारात्मक भाव दर्शवणार्‍या पेटिंग्स, फोटो लावू नये. सकारात्मक ऊर्जा प्रदान करणार्‍या जसे सूर्य, हिरवे बाग, फुलं, आनंदी मुलं, अश्या पेटिंग्स लावाव्या.
 
* घरात अलमारी आणि पलंग ठेवताना लक्ष द्या की या दोन्ही वस्तू दक्षिण पश्चिमी भिंतीला चिटकवून आणि उत्तर पूर्वी भिंतीपासून लांब असाव्या.
 
* बेडरूममध्ये उत्तर-पूर्वी भाग रिकामा सोडून बेड बीमखाली नसावा याची काळजी घ्यावी.

* अनेकदा दार उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असतो, वास्तूप्रमाणे हे योग्य नाही.
 
* घरात हनुमानाची मूर्ती असल्यास ती दक्षिण-पूर्वी दिशेत नसावी याची काळजी घ्यावी.
 
* झोपताना आपले पाय दक्षिण दिशेकडे नसावी याची काळजी घ्यावी.
* घरातील उत्तर पूर्वी क्षेत्र नेहमी स्वच्छ ठेवावे. असे न केल्यास कुटुंबातील मुखिया किंवा इतर कोणी सदस्य आजारी पडू शकतं.
 
* घरातील प्रार्थनास्थळे वॉशरूम जवळ असेल तर हे स्थान परिवर्तित करावे. हे जवळपास नसावे. याव्यतिरिक्त रोज संध्याकाळी देवघरात उदबत्ती लावावी.