गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Vastu Tips : ऑफिसमध्ये प्रमोशन हवे असेल तर हे 5 उपाय करून बघा

शाळा, कॉलेजच्या मुलांपासून नोकरी करत असलेले लोकांमध्ये स्वत:ला श्रेष्ठ साबीत करण्याचा प्रयत्न सुरू असतो. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी, चांगला जॉब मिळवण्यासाठी एवढंच नव्हे तर उत्तम जोडीदार मिळवण्यासाठी लोक रेसमध्ये सामील होण्यासाठी तयार असतात. खास करून जॉबबद्दल बोलायचे झाले तर हा एक असा क्षेत्र आहे ज्यात स्पर्धा आपल्या चरमवर आहे. जीवनाचे यश अपयश फक्त आपल्या जॉबच्या स्थितीवर निर्भर करते. तुमचे ऑफिसमध्ये काय स्टेटस आहे आणि तुमचा पगार किती आहे, ह्या दोन्ही गोष्टीपण तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात आणि त्यापासून दूर देखील जाऊ शकतात.  
 
प्रमोशनच्या आपल्या शक्यतेला वाढवण्यासाठी काही सोपे उपाय
1. लक्ष्य निश्चित करा आणि कार्य चांगल्या प्रकारे करा : असे म्हणणे अनुचित नसेल की बीन मेहनत आणि समर्पणाचे सुनिश्चित प्रकारे प्रमोशनवर विचार करताना तुमची उपेक्षा केली जाईल. वास्तविक लक्ष्य निश्चित करा आणि त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा.  
 
2. आपला मेंटर तयार करा आणि सल्ला घ्या : योग्य माहिती ठेवणार्‍या एखाद्या वरिष्ठ अधिकारीशी मित्रता करा आणि त्याकडून माहिती मिळवून घ्या की त्यांनी कशा प्रकारे प्रमोशन प्राप्त केले होते आणि शीर्ष प्रबंधन (टॉप मॅनेजमेंट) द्वारे कर्मचारीमधील कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांचे बहुमूल्य फीडबॅकनुसार तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकता.  
 
3. नवीन कौशल प्राप्त करा : तुम्ही कुठे ही काम करत असाल, नवीन कौशल नक्की शिका ज्याने तुम्हाला संगठनाच्या पुढली स्तरावर जाण्यास मदत मिळेल.  
 
4. बसण्याची व्यवस्था: जेव्हा तुम्हाला तुमच्या कार्यस्थळावर बसण्याची जागा देण्यात येते, तर निश्चित करा की ही जागा बीमच्या खाली नसावी आणि तुमची पाठ मुख्य प्रवेश दाराकडे नसावी. बीममुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अवरोधित होतो. 
 
5. आपल्या कार्यालय /कार्यस्थळाला व्यक्तिगत रूप प्रदान करावे : वर्तमानात कार्यालयांमध्ये कर्मचारी आपल्या कार्यस्थळाची सजावट करू शकतात. तुम्हाला तुमच्या मागच्या भिंतीवर पहाडांची पेंटिग्स लावायला पाहिजे. ही मदतीची सूचक असते आणि तुमच्या श्रेष्ठ प्रदर्शनात मदत मिळते.