शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

अंकावरून मिळकत व खर्च ओळखा!

नवीन घर बांधण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी ते आपल्या कसे फायदेशिर ठरेल, हे पाहणे आवश्यक आहे. तसेच आपली मिळकत व होणार खर्च याचे गुणोत्तर काढले पाहिजे.

मिळकत कशी काढाल: सगळ्यात आधी घराचे क्षेत्रफळ काढावे. काढलेल्या क्षेत्रफळाला आठाने भाग द्यावा. जी संख्‍या बाकी राहत असेल त्याला मिळकत समजावी. जर बाकी राहिलेली संख्‍या 1, 3, 5, 7 ह्या पैकी असेल तर घर आपल्याचा सुख, समृध्दी देणारे ठरेल तर 0, 2, 4, 6, 8 ह्या पैकी संख्या बाकी राहत असेल तर हे घर अशुभ ठरू शकते. अशा घराच्या 'बिल्ट अप एरीया'मध्ये परिवर्तन करता येऊ शकते.

खर्च कसा काढाल: घराचे क्षेत्रफळाला आठाने गुणून त्याला 27 ने भाग द्यावा. ही संख्‍या आपल्या घराचे गृह नक्षत्र दर्शवते. या संख्‍येला पुन्हा आठाने भाग भाग दिल्याने बाकी उरलेली संख्‍या म्हणजे 'खर्च'. जर खर्चापेक्षा मिळकतीची संख्या अधिक निघाली तर आपण खरेदी किंवा बांधत असलेले नवीन घर आपल्यासाठी शुभ मानले जाते. जर मिळकत व खर्चाची संख्या सारखीच निघाली तर या घरात आपली उन्नती कदापी शक्य नाही, असे समजावे. अशा घराच्या बांधकामात परिवर्तन करणे आवश्यक असते.

उदाहरण :
मिळकत अशी काळावी-
एका घराचे क्षेत्रफळ 997 वर्गफूट आहे. या घराची मिळकत अशी काढता येईल.

997 या संख्येला आठाने भागले तर 7 बाकी राहते.
7 ही संख्या मिळकत समजावी. घर आपल्यासाठी शुभ आहे.

खर्च असा काळावा-
क्षेत्रफळ - 997 वर्गफूट
997 या संख्येला 8 ने गुणावे. 7976 ही संख्या येते.
7976 या संख्येला 27 भागावे. बाकी 11 येते

वर पाहिलेल्या उदाहरणामध्ये मिळकती पैक्षा खर्चाची संख्या मोठी आली. त्यामुळे घर आपल्यासाठी अशुभ ठरणार आहे. अशा घरात व्यक्तीची उन्नती होत नाही. नवीन घर खरेदी करताना किंवा बांधताना सगळ्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक असते.