testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तू टिप्स : रात्री झोपण्याअगोदर हे नियम पाळा

वास्तूनुसार प्रत्येक मानुष्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने झोपेचे फारच महत्त्व आहे. म्हणून बेडरूमचे वातावरण असे असायला पाहिजे की तुम्ही सुखाची झोप घेऊ शकाल. त्याशिवाय तुम्ही असे काही नियमांचे पालन करू शकता ज्यात तुम्ही सकारात्मक ऊर्जा मिळवून पुढील दिवस देखील चांगला घालवू शकता. तर जाणून घेऊ असेच काही नियम :

योग्य दिशेत झोपावे : रात्रीला पूर्व दिशेकडून पाय ठेवल्याने पैसे आणि मान वाढतो. उत्तर दिशेत पाय करून झोपल्याने तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होते. जर तुम्ही दक्षिण दिशेकडून पाय करून झोपत असाल तर तुम्हाला कधीपण शांत झोप लागणार नाही. तुमच्या डोक्यात वाईट विचार येतील. त्याशिवाय तुमच्या हृदयात भारीपण राहण्याची शक्यता आहे.

पाय धुऊन झोपावे : वस्तूनुसार ऊर्जा आणि पायांमध्ये संबंध आहे. वस्तूनुसार असे म्हटले जाते की जर तुम्ही पायांना धुतले तर ऊर्जा तिथेच राहते कुठे जात नाही. तसेच तुम्ही पायांमध्ये तेल किंवा माइश्चराइजर देखील लावायला पाहिजे. त्याने तुम्ही दुसर्‍या दिवशी अधिक चांगल्याप्रमाणे काम करू शकाल. तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जापण मिळेल.

रात्री झोपण्याअगोदर आपल्या ईष्टदेवाचे ध्यान करावे आणि जे तुम्हाला हवे असेल ते विचार करून झोपावे : वस्तूनुसार रात्री आपल्या
ईष्टदेवाचे ध्यान करून झोपावे. त्यांच्याकडून आपल्या चांगल्या जीवनाची कामना करावी. त्याने तुम्हाला पुढील दिवसासाठी सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होती एवढंच नव्हे तर आपल्या जीवनाबद्दल देखील सकारात्मक वस्तूंचा विचार करून झोपावे.


यावर अधिक वाचा :