गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

दिवाळीला गिफ्ट करू नये या 5 वस्तू

दिवाळीला एकमेकाला शुभेच्छांसह अनेक लोकं गिफ्टही देतात. परंतू वास्तू आणि ज्योतिष्याप्रमाणे काही वस्तू अश्या आहेत ज्या गिफ्ट देणे योग्य नाही. पाहू अश्या वस्तू:
देव मूर्ती: सण म्हटल्यावर अनेक लोकं गणपती किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा शिक्के गिफ्ट म्हणून दुसर्‍या देतात. वास्तूप्रमाणे चुकूनही अशी भेट देऊ नाही. यांच्या पूजेचा एक विधान आहे म्हणून अश्या वस्तू स्वत: खरेदी कराव्या परंतू दुसर्‍यांना भेट म्हणून देणे योग्य नाही.

व्यवसायासंबंधी वस्तू: दिवाळीला आपल्या प्रोफशनसंबंधी वस्तू भेट करू नये. जसे आपला कपड्यांचा किंवा भांड्यांचा व्यवसाय असेल तर कुणालाही स्वत:च्या व्यवसायातील वस्तू गिफ्ट करू नये.

घड्याळ आणि वॉटर शोपीस: घड्याळ निवडायला सर्वात सोपे आणि सर्वांना आवडणारे गिफ्ट आहे. तसेच लोकं वॉटर क्लॉक किंवा वॉटरचे शोपीस देणे ही पसंत करतात. परंतू या वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा ज्ञान असले पाहिजे. गिफ्ट घेणार्‍याला याबाबद माहिती नसल्यास त्यांना हे गिफ्ट सूट होणार नाही.

धारदार वस्तू: वास्तूप्रमाणे धार असलेल्या वस्तू गिफ्ट करणे योग्य नाही. जसे चाकू, कातरी, ब्लेड, तलवार किंवा शोपीसमध्ये धार असलेल्या वस्तू गिफ्ट करायला नको. या वस्तू नकारात्मकता पसरवतात. असे गिफ्ट दोघांसाठी बेड लक ठरू शकतं.

हातरुमाल: दिवाळीला हातरुमाल गिफ्ट करू नये. असे मानले आहे की रुमाल अश्रू आणि घाम पुसण्याच्या कामास येतात. म्हणून रुमाल गिफ्ट केल्याने नकारात्मकता येते.