गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (00:07 IST)

VASTU TIPS: घरातून हटवा ह्या 5 वस्तू आणि नुकसानीपासून स्वत:चा बचाव करा

जास्त करून लोक लकी चार्म आणि अनलकी वस्तूंवर विश्वास ठेवतात. जेव्हा लोकांसोबत काही चांगले होऊ लागले तर ते त्या वस्तूंना लकी मानू लागतात. त्या शिवाय वास्तूप्रमाणे घरात काही वस्तू अशा असतात ज्यांचे घरात राहणे शुभ नसते. वास्तूनुसार यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर निगेटिव्ह प्रभाव पडू लागतो. एवढंच नव्हे तर या वस्तूंमुळे घरात पैशांचा प्रवाहात अडचणी येतात. म्हणून वास्तूनुसार या वस्तूंना घरातून दूर ठेवणेच चांगले असते. तर जाणून घेऊ याबद्दल: 
 
मधमाश्यांचे पोळे : घरात मधमाश्यांचे पोळे हानिकारक असतात तसेच वास्तूनुसार हे घरात बॅडलक आणतात. वास्तूनुसार याला घरातून बाहेर काढणेच योग्य असते. हे हटवण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल लोकांची मदत घ्यावी लागते.   
 
वटवाघूळ : घरात वटवाघूळांचे असणे वास्तूनुसार योग्य नाही आहे. याने घरात आजारपण, दुर्भाग्य आणि गरिबी येते. जर तुमच्या आजू बाजूस वटवाघूळ असतील तर संध्याकाळी घरातील खिडक्या दार बंध ठेवावे.   
 
माकडीचा जाळा : माकडी का जाळा घरातील लोकांसाठी दुर्भाग्य आणतो. यामुळे घरात अनिष्ट घडू शकते. म्हणून वास्तूनुसार घरातील सर्व जाळे साफ करत राहिला पाहिजे.   
 
तुटलेला आरसा : वास्तूनुसार घरात तुटलेला आरसा ठेवणे धन प्रवाहात बाधा आणतो. एवढंच नव्हे याने घरात निगेटिव्ह एनर्जी येते. म्हणून घरात तुटलेला आरसा ठेवू नये.