testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

VASTU: उशी खाली ठेवा या 4 वस्तू, लगेचच दूर होतील सर्व अडचणी

Last Modified मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (12:55 IST)
सर्वांच्या जीवनात त्रास असतात. असे म्हटले जाते की जर जीवनात समस्या आहे तर त्या समस्यांचे समाधानही असतात. ज्योतिष आणि वास्तूनुसार काही उपाय करून तुम्ही जीवनातील बर्‍याच त्रासांपासून मुक्ती मिळवू शकता. या टिप्सचा वापर करून जीवनातील लहान सहन त्रास जसे करियर, हेल्थ, पैसा, लग्न सर्वांमध्ये यश मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत वास्तूचे काही उपाय ज्यांचा वापर करून तुम्ही जीवनात आनंद मिळवू शकता.

रात्री झोपताना उशीच्या खाली लाल रंगाचे चंदन ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येत नाही आणि घरात सुख समृद्धी कायम राहते.

जर तुमच्या कुंडलीत एखादा ग्रह दोष असेल तर या गोष्टीचे खास लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या उशी खाली सोनं किंवा चांदीने तयार केलेली वस्तू ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की याने जीवनात आनंद येतो आणि कार्यांमध्ये येणार्‍या अडचणी दूर होतात.

जीवनात जर भाग्य साथ देत नसेल तर नेमही उशी खाली सिल्वर मेटलने तयार मासोळ्या ठेवायला पाहिजे. यामुळे तुमच्याबरोबर सर्व गोष्टी सकारात्मक व्हायला लागतील.

घरात नकारामत्क ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी बेडच्या खाली लोखंडाच्या भांड्यात पाणी भरून ठेवायला पाहिजे. याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर चालली जाईल आणि घरात आनंदाचे वातावरण येईल. घरात जर नकारात्मक ऊर्जा वाढत असेल तर आपल्या घरात आठवड्यातून दोन वेळा मीठच्या पाण्याने पोचा लावायला पाहिजे.


यावर अधिक वाचा :