testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Vastu tips: घरात चुकूनही ताजमहालाचे फोटो लावू नये
कळत न कळत आम्ही असे काही फोटो किंवा शोपीस आपल्या घरात आणतो, ज्यामुळे घरातील वातावरण प्रभावित होऊ लागत. घरातील
सदस्यांवर याचे दुष्प्रभाव होऊ लागतात आणि आम्हाला ही गोष्ट कळतच नाही. वास्तुशास्त्रानुसार जर आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले तर
आपल्या कुटुंबीयांचे जीवन अधिक चांगले बनवू शकतो.

लोक ताजमहालाला प्रेमाचे प्रतीक मानून याचे फोटो घरात ठेवतात, पण ताजमहालात शाहजहांने आपली बायको मुमताजची समाधी
बनवली होती. म्हणून घरात न तर ताजमहालाचे कुठले ही फोटो
किंवा ताजमहालाचा कोणताही शोपीस ठेवू नये. ही मृत्यूची निशाणी
आणि निष्क्रियतेचे प्रतीक मानले गेले आहे.
नृत्य करत असलेल्या नटराजाची मूर्ती प्रत्येक क्लासिकल डांसरच्या घरी बघायला मिळते. याचे देखील दोन पैलू आहे. जेथे एकीकडे शिव
आपल्या नृत्यात कलेचे रूप दाखवत आहे तसेच दुसरीकडे हे नृत्य विनाशाचे प्रतीक मानले गेले आहे. वास्तूत म्हटले जाते की अशा मुरत्या
आपल्या घरात ठेवणे योग्य नव्हे.

एक अजून प्रतिमा आहे ज्याला आपल्या घरात नाही ठेवायला पाहिजे. ही आहे बुडणार्‍या नावेचा फोटो. वास्तूनुसार बुडणार्‍या नावेचे फोटो
घरात लावल्याने हे कुटुंबीयांमध्ये वैमनस्य निर्माण करत. म्हणून जर तुमच्या घरात असे फोटो असतील तर त्याला लगेचच बाहेर काढायला पाहिजे.


वस्तूनुसार घरात पाण्याच्या झर्‍याचे फोटो लावणे देखील अशुभ मानले गेले आहे कारण ह्या फव्वार्‍याचा फोटो जर घरात ठेवले तर तुमच्या जवळ पैसे जास्त दिवस टिकत नाही. वेळेनुसार पैसा देखील पाण्यासारखा वाहून जातो.

काही लोकांना घरात जंगली जनावरांचे फोटो किंवा शोपीस लावण्याचा शौक असतो. वास्तूमध्ये असे मानले जाते की जंगली जनावरांचे फोटो
किंवा शोपीस लावल्याने कुटुंबीयांच्या स्वभावात हिंसक प्रवृती जास्त दिसते. घरात देवघर असणे फारच गरजेचे असते कारण देवघरामुळे
कुटुंबातील लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळते.


यावर अधिक वाचा :