गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (16:52 IST)

NEW YEAR 2017 : वास्तूप्रमाणे असे करा नवीन वर्षाचे स्वागत

हा नवीन वर्ष तुमच्या जीवनात नवीन उमंग आणि नवीन आनंद घेऊन येईल. नवीन वर्षाचे स्वागत सर्वजण आपल्या पद्धतीने करतात. आपल्या परिवाराच्या सुख आणि समृद्धीसाठी आम्हाला आपल्या घराला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार करायला पाहिजे. नकारात्मक ऊर्जेला घरातून दूर केले पाहिजे. या सोप्या प्रयोगांद्वारे आम्ही नवीन वर्षाचे स्वागत करूया.  
 
नवीन वर्षाचे स्वागत आम्हाला आपल्या घराच्या मुख्य दारापासून करायला पाहिजे. घराच्या मुख्या दारावर ऊं, स्वास्तिक किंवा श्री चे चिन्ह बनवायला पाहिजे. चांदीचे स्वस्तिक देखील लावू शकता. घरातील जुने आणि बोरिंग चित्रांना हटवून द्या. यांच्या जागेवर उत्साहाने भरून देणारे पेंटिंग्स लावा. या चित्रांना पूर्वीकडे लावा. सूर्याची पेंटिंग देखील नकारात्मक ऊर्जेला दूर करते.  
 
घरातून जुना अटाला बाहेर काढू शकता. घराला निळा, पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाने पेंट करा. घरातील उत्तर पूर्व दिशेत लाफिंग बुद्धाची मूर्ती लावणे शुभ मानली जाते. वास्तूत उत्तर दिशेला धन आणि भाग्य वृद्धीसाठी मानले जाते. म्हणून या दिशेत स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. घरातील उत्तर दिशेला कुबेराचे स्थान मानले गेले आहे.  
 
घरातून तुटलेले काच, भांडे, पलंग किंवा तुटके फर्निचर काढून द्यायला पाहिजे. घरात देवाची एखादी खंडित मूर्ती असेल तर ती देखील बाहेर काढायला पाहिजे. कुठलेही तुटके पेन घरात ठेवू नये. घरात प्लास्टिकचे फूल देखीन नाही ठेवायला पाहिजे. नेहमी आपल्या घराला ताज्या फुलांनी सजवायला पाहिजे. नवीन वर्षात घरात मनी प्लांट, तुळशीचे रोप लावायला पाहिजे.