गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे वास्तुदोष आणि उपाय

जर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला खिडक्या असतील तर वास्तूप्रमाणे हे अशुभ आहे. याने दोन्ही बाजूनं येणारे वारं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करेल. ज्यामुळे घरातील प्रमुखला आर्थिक समस्या झेलाव्या लागतील.
उपाय: या दोन्ही खिडक्यांवर गोल पान असलेले झाडं लावावे. काटेरी किंवा टोकदार पानं असलेले झाडं लावणे टाळावे. या जागेवर मनी प्लांटही लावू शकता.

घरातील मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठे झाड असणेही अशुभ मानले आहे. याने घरातील प्रमुख आजारी राहतो आणि कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. न्यायालयात संबंधित अडचणी देखील उद्भवतात. 
उपाय: घराच्या मुख्या दारावर बाहेरच्या बाजूला अष्टकोनी आरसा लावून नकारात्मक ऊर्जेपासून वाचू शकता. किंवा मुख्या दारावर 9 इंचाचा स्वस्तिक मांडायला हवा.

मुख्यदार घरासमोर इतर निर्माणामुळे अवरोधित झाल्यास किंवा घरासमोर दुसरं घर निर्मित झाल्यास दार झाकलं गेल्यास अशुभ मानले आहे. याने गृहस्वामीला हृदयासंबंधी विकार होण्याची शक्यता असते.
उपाय: मुख्यद्वाराच्या उंबरठ्याखाली सहा गोल्डन शिक्के एका ओळीत दाबून द्यावे. किंवा उंबरठ्यावर सहा इंचाची लाल रंगाची पट्टी तयार करवावी.