शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे Drawingroom 'दिवाण खाना’ कसा असावा

दिवाणखाना वायव्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे असावा. यामुळे स्नेह्यांशी आणि पाहुण्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होण्यास मदत मिळते. 
 
दिवाणखाना परंपरागत पठडीतला असेल तर सार्‍या खोलीत पांढरी चादर अंथरण्यात यावी आणि गोलाकार उश्यांना दक्षिण आणि पश्चिमेकडील भिंतीला टेकवून ठेवावे. दिवाणखाना आधुनिक पठडीतला असेल तर फर्नीचर दक्षिण आणि पश्चिम दिशेत राखणे योग्य आहे.
 
दिवाणखान्याचा उत्तर आणि पूर्वेकडचा भाग शक्य असेल तेवढा मोकळा ठेवावा. दिवाणखान्यातील मधला भाग इतर भागाच्या तुलनेन मोकळा ठेवावा.
 
दिवाणखान्याचे प्रवेशदार घराच्या मुख्य दाराच्या तुलनेन लहान असावे. दिवाणखान्यात विजेच्या तारांचे जंक्शन मुख्य बटणाबरोबर आग्नेयेकडील कोपर्‍यात असावे. 
 
पोर्ट्रेट्स आणि पेंटिंग्स दिवाणखान्याच्या ईशान्य दिशेच्या भिंतीवर लावावी. शुभ नसल्या कारणाने रडणारी मुलगी, युद्धाचे दृश्य, रागवलेला माणूस, कावळा, घुबड आणि ससाणा यांची चित्रे नसावीत. 
 
दिवाणखान्यात अणकुचीदार कोपर असलेला टेबल ठेऊ नये, कारण त्यामुळे वाद आणि मतभेद यांचे पेव फुटू शकेल. 
 
तिजोरी कधीही दिवाणखान्यात ठेऊ नये, कारण त्यामूळे आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.
 
होकारात्मक आणि नकारात्मक चक्र पूर्ण होण्यासाठी दिवाणखान्यातील खिडक्या आणि दारे, विरूद्ध दिशेस असावीत. हे कुटुंबाच्या भरभराटीस कारणीभूत ठरेल.
 
दिवाणखान्यात फर्नीचर दाराच्या बाजूला राखण्यात येऊ नये, कारण त्यामुळे नकोअसलेल्या मतभेदांना वाव मिळू शकेल. 
 
ईशान्येकडे असलेले एक्वेरियम, ज्यात एक सोनेरी मासा असावा समृद्धि आणि सौभाग्य आणणारा असतो. 
 
पाळीव जनावरांना विशेषेकरून श्वानांना दिवाणखान्याच्या फर्नीचरवर बसू देऊ नाही, कारण त्यामुळे खोलीच्या चुंबकीय प्रवाहात असमतोल निर्माण होऊ शकेल.