गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे घरात सुखाची निर्मिती करायची असेल तर...

- कृष्णाचे या जगात अनेक स्वरूप आहेत आणि त्याचे प्रत्येक स्वरूप खूप छान व मनाला आनंद देणारे असतात.
- कृष्णाच्या प्रत्येक स्वरूपात अस काहीतरी असतं ज्याने मनात सकारात्मकताचा भाव उत्पन्न होतो. जर आपला वास्तुशास्त्रात विश्वास असेल तर  त्याच्यानुसार कृष्णाचा फोटो घरात लावणं हे शुभ संकेत मानले जाते. 
- आता आपण जाणून घेऊया की घराच्या कोणत्या भागात कृष्णाच्या कोणत्या स्वरूपाचे फोटो लावायला पाहिजे. 
- स्वयंपाक घरात आपण कृष्णाचे लोणी खातानाचा फोटो लावला तर तो अतिशय लाभ देणारा असतो.
- जर तुम्हाला अद्याप मातृसुख मिळाला नसेल तर कृष्णाच्या बाळपणाचा फोटो तुम्ही तुमच्या शयनकक्षात लावायला पाहिजे. पण हा फोटो ज्याकडे स्त्रीचा चेहरा असेल त्या बाजूच्या भिंतीवर लावायला पाहिजे.
- वस्तूप्रमाणे बेडरूममध्ये देवघर असणे उत्तम मानले जात नाही, पण राधा- कृष्णाचा फोटो तुम्ही लावू शकता.
- वस्तूप्रमाणे घरात महाभारताचा फोटो लावणे उत्तम नसतं.
- अशी मान्यता आहे की घरात ज्या स्थानावर कृष्णाचा फोटो असतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो.
- घराच्या पूर्वीकडे तुम्ही कृष्णाचे रासलिला करतानाचा फोटो लावू शकता.
- वास्तुनुसार ही मान्यता आहे की घरात जर आपण वासुदेवाने कृष्णाला टोकरित नेतानाचा फोटो लावला तर घरातल्या बर्‍याच अडचणी दूर होऊ शकतात.