testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तू: घरात आरोग्याप्रमाणे अनुकूल दिशा मिळवा

तुमच्या घरात सदैव आजारपण येत असेल तर याचे उपाय देखील वास्तूत दिले आहेत. हे उपाय केल्याने फक्त तुमच्या घरातील सदस्य निरोगी राहतील बलकी घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील तुम्ही करू शकता. जाणून घेऊ काही टिप्स-
सूर्योदयाच्या वेळेस घरातील सर्व खिडक्या दारं उघडायला पाहिजे . जितके जास्त खिडक्या दारं पूर्व दिशेकडे उघडतील तेवढाच त्याचा फायदा मिळेल.

रात्री झोपताना डोकं उत्तर आणि पाय दक्षिणेकडे नसावे. पृथ्वीच्या चुंबकीय प्रभावामुळे ही दिशा योग्य नसते.

गर्भवती महिलांना वास्तूनुसार ती खोली सर्वात उत्तम असते ज्याची दिशा दक्षिण-पश्चिम असेल.

नवजात बालकांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना घरातील पूर्व किंवा पूर्वोत्तर दिशेत असलेल्या खोलीत ठेवायला पाहिजे. झोपताना त्याचं डोकं पूर्व दिशेत असायला पाहिजे.

हाय ब्लडप्रेशरच्या रोग्यांना दक्षिण-पूर्वेतील बेडरूममध्ये झोपणे उचित नसते. ही दिशा अग्नीशी निगडित असल्यामुळे ती आजारपण अधिक वाढवते.


यावर अधिक वाचा :