testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जागा खरेदी करताय?

vastu
वेबदुनिया|
जागा खरेदी करून आपल्या इच्छेनुसार घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे असते. जागा घेताना वास्तुशास्‍त्राच्या नियमाचे पालन केले नाही तर घर बांधल्यानंतर आपल्याला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असते. जागा खरेदी करण्यापूर्वी खालील नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
1. पूर्व व आग्नेय दिशा उंच व पश्चिम व वायव्य दिशा खोल किंवा दक्षिण व आग्नेय उंच तसेच पश्चिम व उत्तर खोल असेल तर अशी जागा शुभ मानली जाते.

2. पश्चिम दिशा उंच व ईशान्य- पूर्व खोल असेल किंवा आग्नेय दिशा उंच व नैऋत्य-उत्तर दिशेला उतार असेल तर असा ही प्लॉट शुभ असतो.

3. उत्तर दिशा उंच व आग्नेय, नैऋत्य, वायव्य दिशा खोल असे किंवा नैऋत्य व आग्नेय उंच तसेच उत्तर दिशा खोल असेल तर अशी जागा खरेदी करणे लाभदायी असते.
4. आयताकार ‍किंवा चौरस प्लॉट शुभ असतो.

5 पूर्व-पश्चिम लांबी कमी व दक्षिणोत्तर लांबी अधिक असलेला प्लॉट शुभ असतो.

6. गोमुखाकार व गोलाकार प्लॉट अत्यंत शुभ मानले जातात.

प्लॉट केव्हा अशुभ असतो?
1. ईशान्य कोपरा नसेल.
2. दोन मोठ्या प्लॉटच्या मधे फसलेला लहान प्लॉट.
3. प्लॉटचे तोंड (घराचे मुखद्वार) पूर्व-आग्नेय, नैऋत्य किंवा वायव्य दिशेला असेल.
4. प्लॉटमध्ये टणक जमीन व त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असतील.
5. जर ईशान्य कोपरा गोलाकार असेल.
6. दक्षिण दिशेला उतार व उत्तर दिशेला उंचवटा असेल.
7. शेजारच्या प्लॉटला उतार असेल.
8. उत्तर-पूर्व दिशा उंच व पश्चिम दिशेला उतार असेल तर तो प्लॉट अशुभ मानला जातो. असा प्लॉट खरेदी करू नये.


यावर अधिक वाचा :