testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घरातील वादविवादांना द्या मूठमाती

vastu
वेबदुनिया|
घरात वारंवार होणार्‍या वादविवादांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घरातील कर्ता पुरूष विविध प्रकारच्या उपाययोजना करत असतो. वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल तर येणारा प्रत्येक दिवस नवीन वाद घेऊन येत असतो.

घरात सुशोभिकरण व टापटिपपणा असल्याने वातावरण प्रसन्न रहाते. त्यामुळेही वादविवादाला काही प्रमाणात खीळ बसू शकते. घरात नीटनेटकेपणा असला तर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व घरातील सदस्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणते. आजच आपल्या घरात काही नवीन प्रयोग करून पाहा. त्यामुळे तुमच्या घराच्या सौंदर्यात वाढ होण्यासह सकारात्मक ऊर्जाही संचार करेल.

* नकारात्मक ऊर्जा कशी येते?
वास्तुशास्त्रानुसार ज्या बिनकामाच्या वस्तू अडगडीच्या ठिकाणी पडून आहेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नकारात्मक ऊर्जा वावरत असलेल्या घरात आजार, दु:ख वास करत असतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुख-शांती लाभावी म्हणून या जुनाट वस्तू घराबाहेर काढाव्यात व उपयोगी वस्तू घरात ठेवाव्यात.

* सकारात्मक उर्जेसाठी काय करावे?
1. घरातील वस्तूंवर बसलेली धूळ दररोज साफ करावी. तसे केल्याने घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.
2. बंद पडलेल्या भिंतीवरील घड्याळ व बिनकामाचे सामान बाहेर काढा.
3. देव-देवतांच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नका.
4. एकच देवाच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा वा मूर्ती घरात ठेवू नका.
5. घरात सामानाची गर्दी होणार नाही याची काळजी घ्या व घर मोकळे ठेवा.
6. घराच्या सजावटीसाठी मातीचे भांडे, घागरी आदींचा उपयोग करा. मात्र त्यांना रिकामे ठेवू नका त्यात सुगंधित फुले अथवा काही शोभेच्या वस्तू ठेवा.
7. लहान मुलांच्या जुन्या खेळण्याची नियमित साफ-सफाई करा.


यावर अधिक वाचा :

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...
Widgets Magazine

शिवसेनेकडून राहुलचे समर्थन

national news
आपल्या भाषणादरम्यान, राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर आता ...

राहुल गांधीचं भाषण संपल, लगेच फ्रान्सकडून प्रतिक्रिया आली

national news
लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान राफेल विमानांच्या करारावर राहुल गांधी यांच्या गंभीर ...

महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन'; प्रवास भत्ता तिपटीने ...

national news
महाराष्ट्रातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. आमदारांचा प्रवास भत्ता प्रतिकिलोमीटर 6 ...

मोदी सरकार परत सत्तेवर येणार नाही

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय काय? पर्याय केव्हापासून शोधायला लागलात तुम्ही? आजवर ...

युपीत पोलिसांनीच केला बलात्कार, महिलेला अमानुष मारहाण

national news
उत्तर प्रदेशातचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोलिसांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा ...