शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

हे 6 फोटो घर आणि दुकानासाठी असतात अशुभ

कोणते फोटो घरात आणि दुकानात लावण्यासाठी चांगले असतात आणि कोणते फोटो लावल्याने वाईट परिणाम होतो याचा निणर्य घेणे फारच अवघड असतं. जर तुमच्या घरात किंवा दुकानात या पैकी 6 फोटो असतील तर त्याला लगेचच काढून द्यायला पाहिजे.  
 
जाणून घ्या त्या 6 फोटोंबद्दल ...
1. वाहते पाणी किंवा धबधबे फोटो
घरात वाहत्या पाण्याचे किंवा धबधब्याचे फोटो नाही लावायला पाहिजे. वाहत्या पाण्याचे फोटो घरात असले तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. वास्तूनुसार ज्या घरात वाहत्या पाण्याचे फोटो असेल तेथे धन टिकत नाही.

2. रडत असलेल्या बाळाचा फोटो 
आज-कल मॉडर्न आर्टच्या नावावर विचित्र फोटो लावण्याची प्रथा आहे. बर्‍याच लोकांच्या घरात रडत असलेल्या मुलांचे फोटो लावण्यात येतात. या प्रकारचे फोटो घर किंवा दुकानात लावणे शुभ नसते. मुलांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. रडत असलेल्या मुलांचे फोटो लावल्याने दुर्भाग्य वाढ होते. 

3. जहाज किंवा बोट डुबत असल्याचे फोटो 
बुडत असलेली नाव जर घरात ठेवण्यात आली तर ती तुमचे सौभाग्य देखील बुडून देईल. घरात डुबत असलेल्या नावेचे फोटो किंवा शो-पीस तुमच्या संबंधांवर वाईट परिणाम टाकते. म्हणून असे फोटो किंवा शो पीस घरात ठेवणे टाळावे.

4. हिंसक जनावरांचे फोटो
आज-कल जनावरांची पेंटिंग घरात लावण्याची प्रथा आहे. दिसण्यात आकर्षित करणारे हे फोटो तुमच्यासाठी नुकसानदायक साबीत होऊ शकतात. एखाद्या जंगली जनावराचे फोटो किंवा शो-पीस घरात ठेवल्याने घरात राहत असलेल्या लोकांचा स्वभाव देखील रागीट होऊ लागतो. यामुळे घरात अशांती आणि क्लेश वाढतो.

5. महाभारताचे फोटो
महाभारत हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो, म्हणून तो पूजनीय आहे. पूजनीय असला तरी या ग्रंथाला घरात ठेवणे अशुभ मानले जाते, कारण महाभारत हे पारिवारिक कलह आणि क्लेशाची कथा आहे. या ग्रंथातील झालेल्या युद्धाशी संबंधित फोटो घरात ठेवल्याने घरात तणाव आणि वाद विवाद होण्याची शक्यता वाढते. म्हणून या प्रकारचे फोटो घरात ठेवायला नको.

6. कुठल्याही युद्धाला दर्शवणारे फोटो
घरातील कुठल्याही खोलीत युद्ध, जादुगाराचे फोटो नाही लावायला पाहिजे, असे केल्याने घरातील शांती नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये ताण तणावाची स्थिती निर्माण होते. युद्धाची फोटो घरात लावल्याने घरातील सदस्यातील परस्पर प्रेम आणि विश्वासावर त्याचा विपरित प्रभाव पडतो.