गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

वास्तूनुसार लावा नवीन वर्षाचे कॅलेंडर, मिळतील बरेच फायदे

वास्तूनुसार भिंतीवर जुने कॅलेंडर लावणे योग्य नाही मानले जाते. हे तुमच्या प्रगतीच्या आड येतात. म्हणून जुने कॅलेंडराला हटवून द्यायला पाहिजे आणि नवीन कॅलेंडर लावायला पाहिजे. ज्यामुळे नवीन वर्षात जुन्यावर्षापेक्षा जास्त शुभ प्रसंगाची प्राप्ती होईल.  
 
जर वर्षभर तुम्हाला चांगले योग आणि फायदे पाहिजे असतील तर घरात कॅलेंडर वास्तूप्रमाणे लावायला पाहिजे.  
 
वास्तूनुसार कुठे लावायला पाहिजे कॅलेंडर -
कॅलेंडर उत्तर, पश्चिम किंवा पूर्वेच्या भिंतीवर लावायला पाहिजे. हिंसक जनावर, दुखी चेहरे असणारे फोटो लावणे टाळायला पाहिजे. या प्रकारचे फोटो घरात नकारात्मक एनर्जीचा संचार करतात.  
 
पूर्वेकडे कॅलेंडर लावल्याने प्रगतीची संधी येते -
पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे, जो लीडरशिपचा देवता आहे. या दिशेत कॅलेंडर लावल्याने जीवनात प्रगती येते. लाल किंवा गुलाबी रंगाच्या कागदावर सूर्योदयाचा, देवता इत्यादींचे फोटो असणारे कॅलेंडरावर लावायला पाहिजे.
उत्तर दिशेत कॅलेंडर वाढवतो सुख-समृद्धी-
उत्तर दिशा कुबेराची दिशा असते. या दिशेत हिरवळ , फवारा, नदी, समुद्र, झरणं, विवाह इत्यादींचे फोटो असणारे कॅलेंडर या दिशेत लावायला पाहिजे. कॅलेंडरावर हिरवा आणि पांढर्‍या रंगाचा वापर जास्त केला पाहिजे.  
 
पश्चिम दिशेत कॅलेंडर लावल्याने अपुरे काम पूर्ण होऊ शकतात -
पश्चिम दिशा वाहणारी दिशा आहे. या दिशेत कॅलेंडर लावल्याने कार्यांमध्ये गती येते. कार्यक्षमता वाढते. पश्चिम दिशेचा जो कोपरा उत्तरेकडे असेल त्या कोपर्‍यात कॅलेंडर लावायला पाहिजे.
घराच्या दक्षिण दिशेत कॅलेंडर नाही लावायला पाहिजे-
घड्याळ आणि कॅलेंडर दोन्ही वेळेचे सूचक आहे. दक्षिण विरामाची दिशा आहे. येथे वेळेशी संबंधित वस्तू ठेवणे टाळले पाहिजे. हे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा आणते. घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम पडतो.  
 
मुख्य दारासमोर देखील कॅलेंडर नाही लावायला पाहिजे -
मुख्य दारासमोर कॅलेंडर नाही लावायला पाहिजे. दारातून निघणारी ऊर्जा प्रभावित होते. तसेच जोराने वार आल्याने कॅलेंडर हालत आणि त्याचे पानं उलटतात. जे चांगले नाही आहे.