शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

वास्तूप्रमाणे ईशान्य कोपर्‍याचे महत्त्व

घरात ईशान्य कोपर्‍याला अत्यंत महत्त्व आहे. उत्तर कोपर्‍याला ईशान्य कोपरा मानण्यात आले आहे. या जागी देव वास्तव्य करतो, असे वास्तुशास्त्र मानते. त्यामुळेच हा भाग घराच्या बांधणीत कापला गेला असेल किंवा उत्तरेला कोपराच नसेल तर ही बाब अशुभ मानली जाते.

प्रगतीत त्यामुळे बाधा येते. याच भागातून येण्या जाण्याचा रस्ता असेल तरीही ती फार मोठी चुक मानली जाते. कारण पवित्र अशा या जागेतून चप्पल, बूट घालून वावर झाल्यास सहाजिकच प्रगतीत अडथळे येतात.

नेमका हा भाग मोडला असेल, तेथे दार किंवा अन्य काही असेल तर ते बंद केले पाहिजे. तेथे फट नको. ती तातडीने बंद करावी. त्यानंतर ही जागा शुद्ध करून तेथे भगवंताची स्थापना करावी. त्याची मूर्ती ठेवावी. इष्टदेवतेची मूर्ती ठेवल्यास उत्तम. काहीच ठेवणे शक्य नसल्यास पाण्याचा माठ किंवा झाडाचे हिरवे रोप असलेली कुंडी ठेवावी. हा भाग प्रशस्त असल्यास उत्तम. त्याचा आपल्या कुटुंबाला फायदाच होईल. या ठिकाणी असलेल्या खोलीत रहाणाऱ्याची कायम उन्नती होईल.

या जागी पाण्याचा हौद असल्यास व त्याचा दरवाजा वरून असल्यास तो बंद करायला हवा. शौचालयही येथे नको. ते अन्यत्र बांधावे. पश्चिम-दक्षिण दिशेला असल्यास ठीक. शौचालय कधीही उत्तर-पूर्व वा ईशान्येला नको. ही बाब कायम लक्षात ठेवावी.