testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पालक वड्या

palak dhokla recipe
साहित्य : एक जूडी मोठ्या पानांचा पालक, 1 कप बेसन, आवडीप्रमाणे हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले लसूण वाटण, गूळ वा साखर, आंबटपणासाठी एक टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा दोन टेबलस्पून दही, एक टिस्पून तेल (वरून फोडणी द्यायची असेल तर जास्त फोडणीसाठी तीळ, मोहरी, हिरवी मिरची) वरून पसरण्यासाठी कोथिंबीर आणि ओले खोबर.
कृती : पालकाच्या पानांचे शिरा वगळून मोठे मोठे तुकडे करून घ्या. बेसनात दही वा कोळ आणि बाकी मसाले घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट भिजवा. कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा. त्यावर पालकांच्या पानाचा एक थर द्या, पण बाकिचे तुकडे बेसनात घोळवून वर पसरत जा आणि त्याचे थर करा. वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता. कूकरमध्ये शिटी न ठेवता 20 मिनिटे वाफवा. पूर्ण थंड झाले की आवडीप्रमाणे वड्या कापा. पथ्यासाठी या नुसत्यास कोथिंबीर घालून खाता येतील, नाहीतर तेलाची तीळ, जिरे, मिरची घालून फोडणी करून वर ओता व खोबरे कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा.


यावर अधिक वाचा :

आंतराष्ट्रीय मानवी तस्करांची टोळी पकडली

national news
आंतराष्ट्रीय मानवी तस्करीत सहभागी असलेल्या दोन टोळ्यांचा मुंबईतील सहार आणि वर्सोवा ...

माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

national news
भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर (७७) यांचं निधन झालं आहे. जसलोक रुग्णालयात वाडेकर ...

वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक

national news
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ...

स्वांतत्रदिनानिमित्त मोदींनी देशाला केले संबोधित

national news
७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे ...

दुसर्‍या प्रजातींची भाषाही शिकतात पक्षी

national news
पक्ष्यांसाठी आपल्या सहवासातील जीवाचा आवाज ऐकणे व समजणे हे जीवन-मृत्यूमधील अंतरासाठीही ...