शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (12:23 IST)

चविष्ट आंबट-गोड दह्याची करंजी

साहित्य -
150 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम मुगाची डाळ, किशमिश, काजू चुरी, 2 मोठे चमचे खवा, 4 कप दही, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 लहान चमचे जिरेपूड, 1 लहान चमचा काळीमीर पूड, 1 चमचा चाट मसाला, पादेलोण, 1 चमचा पिठी साखर, 1 कप गोड चटणी, 1 कप हिरवी चटणी, मीठ चवी प्रमाणे, तेल तळण्यासाठी.  
 
कृती -
दह्याची करंजी बनविण्यासाठी एक दिवसापूर्वी रात्री उडीद डाळ आणि मुगाची डाळ भिजत टाकावी. दुसऱ्या दिवशी वाटून घ्यावी. हे लक्षात ठेवा की डाळ जास्त ओलसर नसावी. आता या वाटलेल्या डाळीत मीठ, कोथिंबीर, मिरच्या, किशमिश, काजू मिसळा आणि चांगल्या प्रकारे फेणून घ्या. 
 
खव्यात पिठी साखर मिसळा आणि तसेच पडू द्या. या नंतर एक सुती कापड घेऊन त्या कापड्याला ओले करून पिळून पसरवून द्या. डाळीच्या सारणाचा लहान लहान गोळ्या बनवून त्यांमध्ये खवा भरून द्या. नंतर याला बंद करून करंजीचा आकार द्या. करंज्या केल्यावर याला ओल्या कपड्यामध्ये ठेवून द्या. अश्या पद्धतीने सर्व डाळीच्या सारणाच्या करंज्या बनवून ठेवून घ्या. 
 
आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. या तेलात करंज्या तळून घ्या. तळलेल्या करंज्या एका पाण्याच्या भांड्यात पाण्यात घाला. दही तयार करण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्या. दह्यात काळी मिरपूड, काळेमीठ, जिरेपूड मिसळा. या नंतर पाण्यात भिजवलेल्या करंज्यांना पाण्यातून काढून घट्ट पिळून दह्यात बुडवून द्या. काही वेळ आपली इच्छा असल्यास थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवून द्या. काही वेळानंतर काढल्यावर गोड आणि तिखट हिरव्या चटणी टाकून वरून चाट मसाला भुरभुरून सर्व्ह करा.