गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

वजन कमी करायचे असेल तर या प्रकारे बनवा स्वादिष्ट पोळी

आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पण स्वादाशी शिवाय आहार सेवन करणे पटतं नसेल तर आपल्यासाठी खास रेसिपी. 
 
आपल्या केवळ आपल्या आहारात ओट्स सामील करायचे आहेत. ओट्समध्ये कमी कॅलरीज असतात आणि बीटा ग्लूकन अधिक प्रमाण असल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. आपण दररोजच्या आहारात ओट्स सामील करून वजन कमी करू शकता:
 
सामुग्री
½ कप ओट्स 
1 लहान चिरलेला कांदा
½ कप गव्हाचं पीठ
2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर (आवडीप्रमाणे)
मीठ स्वादानुसार
तेल
 
कृती
सर्वात आधी ओट्स भाजून घ्या. नंतर बारीक वाटून घ्या.
आता गव्हाचे पीठ आणि ओट्स पीठ मिसळून मळून घ्या.
काही वेळासाठी मळलेलं पीठ झाकून ठेवा.
नंतर याचे गोळे तयार करा आणि त्यात कांदा आणि कोथिंबीर घालून पोळ्या लाटून घ्या.
तवा गरम करून अगदी कमी प्रमाणात तेल लावा. त्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूने शेकून घ्या.
पोळी तव्यावरच फुलवून घ्या.