Widgets Magazine
Widgets Magazine

मायाळूच्या पानांची पातळ भाजी

mayalu

साहित्य : दोन वाट्या मायाळूची पानं, वाटीभर ओलं खोबरं, पाव वाटी तूरडाळ, तीन हि. मिरच्या, ४ मिरे, दोन-तीन लसूण पाकळ्या, चमचाभर तांदूळ, २ कोकम.
 
कृती : मायाळूची पानं देठासहित खुडून घ्यावीत व स्वच्छ धुवावीत. पाणी पूर्ण निथळल्यावर देठाचे छोटे तुकडे करावेत व पानं बारीक चिरावीत. खोबरे, मिरच्या, लसूण, मिरे व भिजलेले तांदूळ एकत्र वाटावेत.
 
कुकरमध्ये पाण्यात डाळ त्यावर देठ व थोडे मीठ आणि त्यावर चिरलेली पानं घालावीत व शिटी करून भाजी, डाळ शिजवून घ्यावी. मग त्यात मसाल्याचे वाटण, मीठ व दोन कोकम, आमसुले घालावीत व डावाने हलवावे. ही भाजी दाटसरच असते. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. कैरीच्या दिवसात कोकमाऐवजी कैरी घालूनही ही भाजी केली जाते व छान लागWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

Kitchen Tips In Marathi

उकडलेलं अंडं सोलणं ही एक कला आहे. चुकीच्या पद्धतीने अंडं सोलल्यास खराब होतं. अंडं ...

news

आंबा वडी

आंब्याचा गर, दूध व साखर हे सर्व साहित्य मिसळून माइक्रोवेवमध्ये 12 मिनिटापर्यंत ठेवावे. ...

news

शिंगाड्याच्या पीठाचे लाडू

कढईत शिंगाडा पीठ व साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजणे. भाजल्यावर गॅस ...

news

खोबर्‍याच्या वड्या

प्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका ...

Widgets Magazine