शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

Try This : किचन टिप्स

गुलामजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात.
 
मेदूवडे करताना वडय़ाचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात.
 
कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात.
 
ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही.
 
छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात.
 
ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते. तेव्हा १५-२० शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कडी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
 
काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे.
 
कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते.
 
पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे, नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही.
 
इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो. त्याप्रमाणे उपमा बनवावा. चांगला होतो.
 
डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ ४:१ या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण ३:१ असे असावे.