गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

Try This : पाकसल्ला

लाटणे फ्रिजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही.
मासे खाताना काटा घश्यात अडकल्यास एक-दोन केळी खावीत.
काजू व इतर ड्रायफुट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लंवग टाका.
कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.
स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील.
बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वचा व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर
साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका.
पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या. बरे वाटेल.
घरातील कोणताही पंखा (एक्झॉट फॅनसुद्धा) स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा.
भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा.
कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा.
दोसा बनविताना दोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा.
हिवाळ्यात खोबर्‍याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑईलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या.
पावसाळी दमट हवेत खोबर्‍याचे डोल तसेच ठेवू नये. एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहातात.
तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल.
लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा.