शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

किचनच्या उपयोगी टिप्स

* पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. याने भाजीला छान रंग येतो.
* पाव एकसारखे कापले जावे या साठी गरम झालेल्या सुरीने पाव कापावे. सुरीला गरम करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून सुरी गरम करावी.
* मटाराचे दाणे, भोपाळी मिरची, पालक व इतर भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार राहतो.
* अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. याने वड्या चुरचुरीत होतात.
* कलिंगड आणि खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. कोणत्याही पदार्थांची सजावट करताना त्याचा उपयोग होतो.