शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कुरकुरीत मिक्स व्हेज भजी

साहित्य: 1 कांदा, 1 बटाटा, 1 वाटी पालक, 1 शिमला मिरची, 1 वाटी कोबी, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर (सर्व भाज्या चिरलेल्या), मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर, ओवा, बेसन, 2 चमचे रवा, तेल.
कृती: एका भांड्यात काप केलेल्या सर्व भाज्या घ्या. त्या चवीप्रमाणे मीठ टाकून थोड्या वेळ तसेच राहू द्या. नंतर पाणी न मिसळता जेवढं मावेल तेवढं बेसन घाला. त्या रवा, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि ओवा टाका. चांगले मिक्स करा. आता तयार झालेले मिश्रण 15 मिनिटे तसेच ठेवा. यादरम्यान भाज्या पाणी सोडू लागतील आणि मिश्रण दिसू लागेल. यात अतिरिक्त पाणी टाकायची आवशकता नाही. आता मिश्रणात 2 चमचे गरम तेलाचे मोहन टाका. नंतर गरम तेलाच्या कढईत भजी टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. आवडीप्रमाणे वरून चाट मसाला भुरभुरून सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.