शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कॉर्न पालक

साहित्य: पालक, कणीस, मक्क्याचे पीठ, दूध, चीज, क्रीम, टोमॅटो, मीठ, मिरपूड, आले, हिरवी मिरची, लसूण, लोणी.

कृती: कणीस उकडून घ्यावे. पालकाची पाने धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. टोमॅटो वाटून पेस्ट करून ठेवा. लोणी टाकून मक्क्याचे पीठ भाजावे. पीठ भाजल्यावर दूध टाकून हलवत राहा. पीठ घट्ट झाल्यावर पालक, वाटलेल्या टोमॅटोचे मिश्रण त्यात टाका. मिरपूड, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट टाकून उकळू द्या. त्यात उकडलेले कणसाचे दाणे टाकून मंद आचेवर शिजवावे. चीज किसून घ्यावे. त्यात क्रीम टाकून सर्व्ह करा.