गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

कोथिंबीरीच्या वड्या

- राजश्री शिन्दोरे

WD
साहित्य- २ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी डाळीचे पीठ, लाल-तिखट, २ टे. स्पू. आले-लसूण पेस्ट, १ टी स्पू.साखर, १ टी स्पू. चिंचेचा कोळ, चिमूटभर खायचा सोडा, १ टी स्पू. तेल.

कृती - सर्वप्रथम सर्व साहित्य मिक्स करून घ्या. मायक्रोवेव्हमधल्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये थालीपिठाप्रमाणे थापून लावा, दुसर्‍या मोठय़ा मायक्रोवेव्ह ट्रे मध्ये थोडं पाणी टाकून मायक्रोवेव्हमध्ये ठेवून पाण्यात थापलेल्या मिश्रणाचा ट्रे ठेवा. त्यावर झाकण ठेवून हायवर (100%) 10 मिनिटं ठेवा. गार झाल्यावर वड्या कापा, वड्यांवर वरून थोडं तेल पसरवून टाका. हा ट्रे पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये हाय रॅकवर 2 मिनिटं ठेवा. वड्या तळल्याप्रमाणे खुसखुशीत होईपर्यंत किमान पाच मिनिटं ग्रिल करा.