बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 4 फेब्रुवारी 2015 (17:38 IST)

गाजराचे पराठे

साहित्य : मध्यम आकाराचे 3-4 गाजरे, 2 वाट्या कणीक, 3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा लिंबाचा रस, चवी प्रमाणे मीठ, 1 चमचा साखर, कोथिंबीर चिरलेली, 1 चमचा जिरे, पाणी व तेल. 
 
कृती : सर्वप्रथम गाजरे धुऊन साले काढून किसून घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटून गजराच्या किसात घालावे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून 10-15 मिनिटे ठेवावे. नंतर पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक 10 मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबिरीसोबत सर्व्ह करावे.