शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चीले चपाती

साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, कोथिंबीर, तेल.
 
कृती: बेसन पिठात तिखट, हिंग, मीठ, हळद, ओवा कोथिंबीर, पाणी घालून एकजीव करून घ्यावे. गव्हाच्या पिठात मीठ घालून मळून घ्यावे. पोळी लाटून तव्यावर तेल लावून भाजून घ्यावी. बेसनाच्या पिठाचे मिश्रण चपातीवर बाजूने सारवावे. अलगद उलटावे व बाजूने तेल सोडावे. दुसर्‍या बाजूवर पीठ सारवावे व दोन्हीकडून तेल सोडून क्रिस्पी होयपर्यंत परतावे. दही, केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करावे.