शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

नागपुरी बटाटे भात

साहित्य: 2 वाट्या तांदूळ, 4 बटाट्यांचे तळलेले तुकडे, मसाला, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, 2 तुकडे दालचिनी, 3 चमचे धने, पाव वाटी खोबर्‍याचा कीस, 1/3 कप दही.
 

कृती: प्रथम मसाला वाटून त्याला भरपूर तेलाच्या फोडणीत परता. त्यात तळलेले बटाटे व दही घाला. तांदूळ घाला. पुन्हा थोडे परता. नेहमीप्रमाणे 2 पट पाणी व मीठ घालून भात शिजवा. तळलेले काजू घाला.