शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

पनीर मखनी

सॉससाठी: 2 चमचा लोणी, अर्धा किलो टोमॅटो, दीड चमचा मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, 4 चमचे साखर, 4 चमचे क्रीम, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कसुरी मेथी, 1 थेंब लाल रंग.
 
कृती: प्रथम 1 चमचा लोणी गरम करून 1 चमचा तिखट-मीठ-साखर, टोमॅटो घालून कुकरमध्ये शिजवा. मग गाळून त्यात लिंबाचा रस, क्रीम घाला. उरलेल्या लोण्यात पनीरचे तुकडे परता. 1-1 चमचा आलं-लसूण पेस्टही घाला. हे तयार पनीर वरील सॉसमध्ये घाला. (सॉस पातळ नको) देताना वरून 1 चमचा बटर व कोथिंबीर घाला. कसुरी मेथी किंचित गरम करून शेवटी घाला. त्यामुळे वास टिकून राहतो.