गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

पोटॅटो चिप्स

ND
साहित्य : 2 मोठे चमचे बटाटे अर्धवट उकडलेले, एक मध्यम कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 1/2 कप मैदा, चमचाभर तांदळाची पिठी, चिमूटभर हळद, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर सोडा, थोडासा बेदाणा, थोडे काजू, लाल तिखट, तळण्यासाठी तेल.

कृती : बटाटे सोलून एका बटाट्याचे 7-8 असे पातळसर काप करा. मैदा व तांदळाचे पीठ एकत्र करा. त्यात गरम तेल थोडंसं, लाल तिखट, मीठ, हळद व चिमूटभर सोडा घालून हलवा. पाणी घालून सरबरीत भिजवा. कांदा, आलं, लसूण वाटून घेऊन त्यात घाला. या मिश्रणात बटाट्याचे तुकडे बुडवून तापल्या तेलात खमंग तळा. गरमागरम पोटॅटो चिप्स टोमॅटो सॉसबरोबर द्या.