शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

मका बाटी

साहित्य : ५०० ग्रॅम मक्याचा आटा, जिरं, हिंग, तिखट, मीठ (सर्व मसाले अंदाजे स्वादानुसार), एक मोठा चमचा धने पूड, एक चिमूट भर खाण्याचा सोडा आणि तेल. 

कृती : सर्वप्रथम कणकेत सर्व मसाले घालावे, गार पाण्याने कणीक मळून घ्यावी व नंतर त्याच्या बाट्या तयार कराव्या. एका भांड्यात उकळी आलेल्या पाण्यात तयार बाट्या घालाव्या. उकळताना मधून मधून त्यांना हालवत राहावे, ज्याने त्या खाली भांड्याला लागणार नाही. उकळ्यांनंतर बाट्या वर येऊ लागतील. त्यांना झाऱ्याने बाहेर काढून चाळणीत ठेवायला पाहिजे ज्याने त्यातील पाणी निघून जाईल. गरम ओव्हनमध्ये भाजून घ्याव्या. तेल गरम करून बटाट्याचे तुकडे करून तळून घ्याव्या. मक्याच्या ह्या तळलेल्या बाट्या फारच चविष्ट लागतात. याला तुम्ही ताक किंवा कढी सोबत सर्व्ह करू शकता.