शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

राजमा

साहित्य: 250 ग्रॅम लाल रंगाचा राजमा, 5 लवंगा, 2 इंच दालचिनी, 2 मसाला वेलदोडे, 2 तमालपत्रं, 4 कांदे, वाटलेलं आलं, 4 टोमॅटो, 15 लसूण पाकळ्या, लाल तिखट, 1 टेबलस्पून दही व 1 टेबलस्पून दूध.
कृती: राजमा 5-6 तास कोमट पाण्यात भिजवा. शिजवताना लवंगा, दालचिनी, वेलदोडे, तमालपत्रं घाला. कढईत तूप गरम करून त्यात चिरलेले कांदे परता, आलं घाला. 2 टोमॅटो चिरून घाला. लाल तिखट, वाटलेलं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट घाला. शिजवलेला राजमा घाला. दही व दूध एकत्र करून घातल्यास चव छान येते. भातासोबत सर्व्ह करा.