गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

वर्‍हाडी गोळ्याची आमटी

गोळे बनवण्याचे साहित्य: 1 कप हरभरा डाळीचा भरडा (रवाळ पीठ), 2 टेबलस्पून बेसन. आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, धने, जिरेपूड.

इतर साहित्य: तेल, मेथी, मोहरी, जिरे, 10-12 कढीलिंबाची पानं, 4 सुक्या लाल मिरच्या, हिंग, 1 कांदा चिरून, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, जिरे व खोबरं भाजून-कुटून.

कृती: भरड्यात बेसन मिसळा. त्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, धने, जिरेपूड घाला. थोडं मोहन घालून गरम केलेल्या पाण्यात लावून ठेवा. 2 तासांनी लहान-लहान गोळे बनवा. नेहमीसारखी फोडणी बनवून, त्यात 5-6 कप पाणी घालून उकळा. कोथिंबीर व इतर साहित्य घाला. तार गोळे घालून उकळा.