गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

व्हेजिटेबल सॅलड

ND
साहित्य : फ्लॉवरचे लहान तुरे, बीन्स, बेबीकॉर्न थोडं-थोडं घेऊन मीठ घातलेल्या पाण्यात किंचित वाफवून घ्या. गाजर, काकडी, एक मोठा टोमॅटो चिरून घ्या. सात-आठ चेरी, 7-8 मश्रुम, थोडं पनीर, 2 संत्री सोलून,1 कप ताज्या अननसाचे तुकडे.

कृती : ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या घ्या. एक टेबल स्पून प्रत्येकी लिंबाचा रस व मध, दालचिनी पूड व मीठ चवीनुसार एकत्र करून ठेवा. भाज्या एकत्र करून गार करा. सर्व्ह करण्यापूर्वी लिंबाचा रस घाला. एका डिशमध्ये सॅलडची पानं पसरून त्यावर सॅलड घालून सर्व्ह करा.