शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

स्पेशल पुदिना राईस

साहित्य : 2 वाटी तांदूळ, 2 वाटी पुदिनाचे पाने निवडून व धुवून, फोडणीसाठी तेजपान, जिरे पाच ते सहा लसूण पाकळ्या, अंदाजे मीठ, लाल मिरची फोडणीसाठी. 
 
कृती : पुदिना व लसूण पेस्ट बनवून घ्या. तांदळाचा मोकळा भात शिजवून थंड होऊ द्या. पुलाव मसाला लहान 1 चमचा, गरम पॅनमध्ये तेल, जिरं, तेजपान व मिरची घालून फोडणी होऊ द्या. त्यावर वाटलेला पुदिना घाला व परत पुलाव मसाला घाला चांगले परतून शिजवलेला भात घाला. मीठ घाला, परतून वाफ येऊ द्या. खोबर्‍याचा किस व पुदिना पानं लावून सजवा व खायला वाढा. यामध्ये मिक्स पालक थोडी वाफवून व वाटून आपण घालू शकता.